Ad will apear here
Next
अनमोल सणांच्या गोष्टी
आपले सण व उत्सव हे आपल्या संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे. आपली संस्कृती टिकून राहण्यास आणि पुढे नेण्यास ते उपयुक्त ठरतात; तसेच सद्गुणांची परंपरा कायम राखतात. त्यामुळे नव्या पिढ्यांना सणांचे महत्त्व समजायला हवे. त्या दृष्टीने श्रीकांत गोवंडे यांनी या पुस्तकात आपल्या सण-उत्सवांची माहिती दिली आहे.

गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला सण. पाठोपाठ रामनवमी, परशुराम जयंती, अक्षय्य तृतीया हे सण येतात. या सणांच्या माहितीबरोबर श्रावण महिन्यांतील सण, भाद्रपदातील गौरी-गणपती येतात. या सणांचे सांस्कृतिक महत्त्व पुस्तकातून समजते. दिवाळी, मकरसंक्रांत, होळी येते. पोंगल, ओणमसारख्या परप्रांतीय आणि ईद, नाताळ, नवरोज अशा अन्य धर्मातील सणांचीही ओळख होते. त्याचबरोबर स्वातंत्र दिन, प्रजाक्सताक दिन, गुरुनानक जयंती अशा उत्सवांची माहितीही पूरक चित्रांसह समजते.

प्रकाशक : अनमोल प्रकाशन
पाने : १५२
किंमत : ११० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZNZCK
Similar Posts
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी शिवचरित्र हा तमाम मराठी वाचकांसाठी एक वाचनीय ठेवा असतो. लेखक श्रीकांत गोवंडे यांनी प्रामुख्याने बालवाचकांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी हे पुस्तक लिहिले आहे. रायगडावरील विविध ठिकाणांची छायाचित्रे, प्रतापगड, पावनखिंड आदी ठिकाणांचे फोटो या पुस्तकात आहेत. शहाजी महाराज आणि जिजाऊ यांच्या विवाहापासून
भावार्थ श्रीगुरुचरित्र आपल्याकडील विविध संप्रदायांत दत्तसंप्रदायाला मोठे महत्त्व आहे. या संप्रदायात श्रीपादवल्लभ, नृसिंहसरस्वती, जनार्दनस्वामी यांसारखे थोर पुरुष होऊन गेले. अध्यात्म व धर्मरक्षणाचे कार्य त्यांनी केले. ही परंपरा पुढे माणिकप्रभू, अक्कलकोटचे स्वामी आणि टेंबे स्वामी महाराज या दत्तभक्तांनी पुढे चालविली या सर्वांनी दत्त महाराजांची उपासना केली
राजनीती आणि राजव्यवहाराचे दिग्दर्शन करणारा चाणक्य आणि त्याचे अर्थशास्त्र ‘सगळे विरोधक जर आपापले मतभेद आणि शत्रुत्व विसरून एक होत असतील, तर त्या देशाचा राजा प्रामाणिक आहे, असे निश्चित समजावे.’ हे वाक्य आज सगळ्या समाजमाध्यमांमध्ये फिरत आहे. त्याचा प्रतिपादक आहे आर्य चाणक्य ऊर्फ कौटिल्य. अचानक घडलेल्या राजकीय घडामोडींनंतर चाणक्याच्या नावाची चर्चा होते; पण प्रत्यक्षात चाणक्याची
संस्कृत-मराठी-इंग्लिश शब्दकोश संस्कृत शब्दांचे अर्थ मराठीत व इंग्रजीत एकत्र देणारा हा पहिलाच शब्दकोश आहे. यामध्ये शब्दाच्या अर्थाशिवाय व्याकरणाच्या दृष्टीने त्याची नामलिंग, सर्वनाम, विशेषण, अव्यय, गण, धातू यांची माहितीही कंसात दिली आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक अशा दोहोंसाठी तो उपयुक्त ठरावा.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language